Monday, 14 January 2019

Tale 17

 *🚩🚩पुष्प = {५४},🚩🚩*

*कथा श्री शंकर महाराजांची श्री स्वामी समर्थ आदेशानुसार स्व: ला शोधण्याची...*


  शंकरमहाराज पुष्कळदा नगरला येऊन राहत. त्या वेळी श्री आबासाहेब श्रोत्रीय वकील, श्री हरीभाऊ थोरात, श्री नानासाहेब मिरीकर, जनुभाऊ मिरीकर, कँप्टन हुसेन आणि इतर मंडळी श्री भाऊराव धनेश्वरांच्या माडीवर हाँलमध्ये जमत असत. सत्संग करीत. डॉक्टरांना मात्र महाराज तिथे बसू देत नसत. म्हणत, "तू तुझ्या दवाखान्यात जा. कर्तव्य आधी." 
  सर्वांच्या मैफिलीत डॉक्टर नसले तरी त्यांची आणि महाराजांची अंतरंगभेट रात्री होत असे. कधी बोलत तर कधी रात्र रात्र दोघंही एकमेकांच्या सान्निध्यात नुसते स्वस्थ बसून राहत. हा शब्दावाचून संवाद, हे मौनातून व्याख्यान कसं घडे ते त्या दोघांनाच माहित! 
  एकदा महाराज सलग सहा महिने नगरला राहिले. त्या काळात त्यांनी डॉक्टरांना नाना विद्यांचं ज्ञान दिलं. अष्टसिद्धीही शिकवल्या. त्यांतली एकेक सिद्धी आत्मसात करायला इतरांना बारा बारा वर्षे लागायची. पण डॉक्टर अवघ्या आठदहा दिवसांत ती हस्तगत करीत. मिळालेल्या सिद्धीचा स्वतंत्रपणे प्रयोग करून पाहत. आणि ती साध्य झाल्याची खात्री पटली की म्हणत, "हिच्यात अडकून पडण्यात काही अर्थ नाही. मला यापुढची शिकवा." अशा सर्व सिद्धी प्राप्त झाल्या तरी ते खरोखरच त्यांच्या मोहात पडले नाहीत. स्वतःच्या संसारासाठी त्यांनी त्याचा वापर केला नाही. प्रपंचातल्या अडचणी त्यांनी सामान्य माणसासारख्याच 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत आपत्तींना सामोरं जात, संकटाशी धैर्यानं सामना करीत सोडवल्या. ऐहिक संपत्तीची लालसा त्यांना कधी शिवलीही नाही.
  डॉक्टर स्वतः सिद्धींना वश झाले नाहीतच, पण त्यांनी त्यांच्या अधीन होऊन प्रतिष्ठा मिळवणाऱ्या माणसांनाही ताळ्यावर आणलं. त्यांचं पितळ उघड पाडलं. 
  त्यातलाच हा एक प्रसंग.
  एकदा डॉक्टरांच्या दवाखान्यात डॉक्टर हकीमसाहेब अचानक आले. म्हणाले, "मी अशा अवेळी तुमच्याकडे का आलो माहीत आहे ? कारण या गृहस्थांना तुम्हांला तातडीनं भेटायचं आहे."
  "या ना. बसा." त्यांचं डॉक्टरांनी स्वागत करीत म्हटलं. मग ते त्यांच्याबरोबर आलेल्या अपरिचित तरूण माणसाकडे निरखून पाहू लागले. तोच हकीमसाहेब म्हणाले, "बडी ताज्जुबकी बात है, डॉक्टरसाहेब. हे लाहोरहून आले आहेत. पहिल्यांदाच आले आहेत. तरीही ते नेमके माझ्या घरी आले. आणि त्यांनी तुमचाही ठावठिकाणा बरोबर शोधून काढला. अहो, त्यांना तुमचं नावही माहित नव्हतं आणि घरही माहित नव्हतं. आता बोला. आहे की नाही अनहोनी बात ?"
  डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्याचा भाव नव्हता. त्यांनी अगदी थंडपणानं त्या अनाहुताला विचारलं, "असं कोणतं महत्वाचं काम काढलं आहे ?"
  "मी उत्तम ज्योतिषी आहे. भूतभविष्य जाणणारा आहे. मला आपल्याला दोन-तीन गोष्टी सांगायच्या आहेत."
  त्याच्या 'गोष्टी'त काहीही उत्सुकता न दाखवता डॉक्टरांनी म्हटलं, "बरं पण आपण चहा घ्याल ना ?"
  "हां, हां. जरुर!"
  चहापान झाल्यावर मधे ठेवलेल्या तबकातून विडे करून तिघांनी खाल्ले. पान चघळीत तो गृहस्थ गप्पा मारू लागला. म्हणाला, "डॉक्टरसाब, तुम्हाला लडका होणार आहे. एकोणीसच्या जानेवारी महिन्यात. दहा तारखेला."
  त्यानं जन्माची वेळ तर सांगितलीच, पण मुलाच्या अंगावर असणाऱ्या जन्मखुणाही सांगितल्या. डॉक्टरांनी ती सर्व माहिती डायरीत टिपून ठेवली. मग अगदी सहजपणानं ते हकीमसाहेबांशी इतर विषयावर बोलू लागले. 
  गृहस्थ अस्वस्थ झाला. त्यानं थोडा वेळ वाट पाहिली. अखेरीस न राहवून त्यानं डॉक्टरांना विचारलं, "मला ही माहिती कशी कळली हे समजून घ्यावं असं नाही का वाटत तुम्हांला?"
  "नाही. कारण ते मला माहित आहे."
  "क्या मालुम है आपको ?"
  "ते मी नंतर सांगतो. आधी तुम्ही सांगा."
  "मी ज्योतिषाचा सखोल अभ्यास केला आहे. बहोत किताबे वाचली आहेत." असं म्हणून तो जेव्हा भराभरा मोठमोठ्या पुस्तकांची नावं सांगू लागला तेव्हा डॉक्टर उसळून उदगारले, "झूट! साफ झूट!! निखालस खोटं!!!"
  "क्या झूट ?"
  "अभ्यास केल्याच्या तुमच्या वल्गना झूट! तुम्हाला ज्योतिषाचा साधा गंधही नाही. लाहोरमधल्या एका पीराला तुम्ही वश करून घेतलं आहे. त्यानं तुम्हाला पुढच्या गोष्टी बघायची शक्ती दिली आहे इतकंच!"
  गृहस्थ गोरामोरा झाला. पण उसन्या अवसानानं म्हणाला, "आपण हे कशाच्या बळावर सांगताहात, डॉक्टर?"
  "माझ्या गुरूच्या कृपाबळावर. तुमच्या त्या पीरापेक्षा माझा गुरु फार मोठा आहे. फार मोठा! त्यानं मला अतिंद्रिय विद्या दिल्या आहेत."
  गुरूभक्तीनं उजळेल्या डॉक्टरांच्या तेजस्वी मुद्रेकडे पाहून तो पाखंडी पार चीत झाला. अवाक् झाला.
  "क्यों रे ? डॉक्टरसाब सांगतात ती बात सच है ?" डॉक्टर हकीमसाहेबांनी  त्याला जरा जरबेनंच विचारलं.
  "जी हाँ !" तो भीतभीत म्हणाला.
  "माफ करना, डॉक्टरसाब. आपले गुरु बहोत बड़े आहेत. कुठे असतात ते ?" 
  "इथे. आमच्या हृदयात."
  तेवढ्यात त्याचं लक्ष मेजावर ठेवलेल्या शंकरमहाराजांच्या फोटोकडे गेलं. "हेच का ते ?" त्याच्या  या प्रश्नाला डॉक्टर हकीमसाहेबांनी उत्तर दिलं. म्हणाले,"हेच आहेत डॉक्टरसाहेबांचे गुरु. शंकरमहाराज."
  तो गृहस्थ उठला. त्यानं मोठ्या आदरानं महाराजांना कुर्निसात केला. आणि पुन्हा एकदा डॉक्टारांची क्षमा मागून, त्यांनाही नमस्कार करून तो डॉ. हकीमांबरोबर निघून गेला.
  डॉक्टर मग कितीतरी वेळ स्वस्थ बसून राहिले. त्यांच्या मनात येत होतं, 'इतक्या लांबून हा माणूस खरंच का केवळ आपलं भविष्य सांगायला आला असेल ? की त्याचं येणं ही महाराजांची एक लीला आहे ? माझी कसोटी लावणारी एक परिक्षा आहे ?'...क्रमशः ...

*लेखन : श्रीमती मृणालिनी जोशी*
[1/7, 2:33 PM] ‪+91 99694 76090‬: *आज श्री नृसिंहसरस्वती महाराज जयंती*

पौष शुक्ल द्वितीया 
सोमवार दि ७_१_२०१९ दुपारी १२वाजता

।।माधव स्त्री सती आंबिका कारंजी थोर। पूर्व जन्मी तिजसी श्रीवल्लभवर।।

 पुढील जन्मी तव कुशी धरीन अवतार। म्हणोनी अंबे कुशी आले ऐका तिथीवार।।

 द्वितीया शुद्धपौष शततारावरी। मध्यान्ही अवतरले नरहरी शनिवारी।।

-----------------------
*नृसिंह सरस्वती*
------------------------

नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८-१४५९) हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे  दुसरे पूर्णावतार मानले जातात.

 नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.

*अकोला जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला.* 

त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. 

*गुरुचरित्रातील एक कथा पुढीलप्रमाणे--*

नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ॐकाराचा उच्चार केला. परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे.

वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यासदीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले.

त्यानंतर गाणगापुरी ते चौवीस वर्षे राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले.

नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. 
त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. 
या सर्वानी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.

महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. 

*।। दत्त दत्त जय।।*
-------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*

No comments:

Post a Comment